सरितानगरी फेज १ - वाटचाल नवनिर्माणाकडे
मुठा नदीच्या काठावर वसलेला १९२ सदनिका असलेला भव्य गृहनिर्माण प्रकल्प म्हणजे आपली सरिता नगरी. सन १९८९ साली पुण्यातील त्यावेळचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक विनायक उर्फ ए्. व्ही. भट यांनी हाती घेतलेला बांधकाम प्रकल्प १९९६ साली पूर्ण झाला. सर्वांना आपल्या सदनिकांचा ताबा मिळाला. अतिशय शांत परिसर, प्रशस्त पार्किंग, भरपूर सूर्यप्रकाश आणि मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मोकळी जागा अशा भरपूर सुविधांमुळे इथल्या सर्व सदनिका वेगाने विकल्या गेल्या. १ रुम किचनच्या १६ सदनिका असलेली एक इमारत, २ बीएचकेच्या प्रत्येकी १६ सदनिका असलेल्या ८ इमारती आणि ३ बीएचकेच्या प्रत्येकी १२ सदनिका असलेल्या ४ इमारती असा एकूण १३ इमारतींचा १९२ सदनिका असलेला हा भव्य प्रकल्प.
आता आपली सरिता नगरी कात टाकतेय आणि येतेय नव्या रंगात, नव्या ढंगात आणि सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त अशा स्वरुपात………लवकरच.